HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! आरोग्यमंत्र्यांसह बैठकीत असतानाच मालेगाव आयुक्तांचा ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रिपोर्ट समोर

मालेगाव | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना आता एक चिंताजनक अशी बातमी समोर येत आहे. मालेगावच्या महापालिका आयुक्तांचा कोरोनाचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज (१३ मे) मालेगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत सुरु असलेल्या आढावा बैठकीतच मालेगावच्या आयुक्तांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्यानंतर आयुक्त तातडीने त्या बैठकीतून बाहेर पडले. या बैठकी आरोग्यमंत्र्यांसोबत कृषिमंत्री दादा भुसे, आणि अन्य लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, याच बैठकीत उपस्थित असलेले आयुक्त कोरोनाबाधित असल्याचे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कलम ३७० हटवताना दाखवलेली हिंमत आता मराठा आरक्षणासाठी दाखवा !

News Desk

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये

News Desk

देशात कोरोनाची दूसरी लाट ओसरल्याचे चिन्ह, नव्या रुग्णांमध्ये झाली घट

News Desk