HW News Marathi
देश / विदेश

जगात महारोगराई पसरल्याचे WHO ने केले घोषित

नवी दिल्ली | कोरोना व्हायरस झपाट्याने सर्व देशांत फैलावत आहे. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगात ४००० जणांनी जीव गमावला असून भारतातही कोरोनाने शिरकाव केला आहे. भारतात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६७ वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसने जगात महारोगराई पसरल्याचे घोषित केले आहे. तसेच, कोरोनाचा सामना करण्यासाठी सगळ्या देशांनी एक होणे गरजेचे आहे असेही या संघटनेने म्हटले आहे.

भारतात एकूण ६७ रुग्ण असून उत्तर प्रदेशात ९ जणांना लागण झाल्याचे आणि केरळमध्ये नवीन ८ कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, दिल्ली आणि राजसथानात १-१ असे नवे रुग्ण आढळले आहेत. भारतातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकार खबरदारीची पावले उचलत आहेत. चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस स्वतंत्र खोलीत ठेवण्यात येणार आहे. तर १५ एप्रिलपर्यंत पर्यटन व्हिसा सरकारने बंद केला आहे आणि हा निर्णय १३ मार्चपासून लागू होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मार्शल अर्जन सिंह यांना भावपूर्ण निरोप

News Desk

आर्थिक घोटाळ्यांच्या बाबतीत मोदी सरकार ‘झिरो टॉलरन्स’

News Desk

३ दिवसांत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढा नाहीतर…बच्चू कडूंचा केंद्राला इशारा

News Desk