HW News Marathi
देश / विदेश

बिहार विधानसभा निवडणूकीची तारीख ठरली, ३ टप्प्यांत होणार मतदान!

नवी दिल्ली | कोरोनाच्या कठीण काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. आज (२५ सप्टेंबर) निवडणूक आयोगाकडून निवडणूकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. बिहार विधानसभेच्या २०२०च्या निवडणूकांसाठी ३ टप्प्यांत मतदान होणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ३ नोव्हेंबरला दुसऱ्या तर ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणूकांचा निकाल १० नोव्हेंबरला घोषित केला जाणार आहे.

आज (२५ सप्टेंबर) दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते अशी माहिती देण्यात आली होती. देशात कोरोनाचा धोका वाढलेला असताना या पहिल्याच मोठ्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे वेगळंच आव्हान निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांसमोरही असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटलजींना आहेत हे आजार…

News Desk

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब

Aprna

‘सगळे कर्ज फेडतो पण कोर्ट केस बंद करा’

News Desk