HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांना कोणी दिलं फिटनेस चॅलेज ?

मुंबई | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी फडणवीस यांना फिटनेस चॅलेज दिले आहे. व्यायाम करतानाचा व्हिडीओ ट्विट करत रुपानींनी हे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांना आपला व्यायाम करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन आणखी एका व्यक्तीला फिटनेस चॅलेंज द्यावे लागेल. देवेंद्र फडणवीस या चॅलेंजला कसे उत्तर देतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी आगळ्या वेगळी पद्धतीचा अवलंब केला आहे. राठोड यांनी व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आणखी काही जणांना नॉमिनेट करत फिटनेस चॅलेंज देण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे ही फिटनेस मोहिमेची साखळी सुरु राहील.

राठोड यांनी गेल्या काही दिवसापुर्वी स्वत:च्या कार्यालयात पुश अप्स करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना फिटनेसबाबत जागरुक करताना ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा नाराही दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निकालापूर्वी विजयी मिरवणूक काढणाऱ्या रत्नागिरीच्या उमेदवारवर गुन्हा दाखल

News Desk

“आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यावर सरकारला जाग येणार?”, फडणवीस आक्रमक

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! रामदास आठवलेंची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी

News Desk