HW News Marathi
महाराष्ट्र

विकसित, विकसनशील आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ देशांनी एकत्र येण्याची गरज, WHO चा सल्ला

मुंबई | कोरोना बाधितांची संख्या देशात तासातासाला वाढत आहेत. जगातील सर्वच देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनाचा वाढता उद्रेक थांबवण्यासाठी जगातील सगळ्या देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आणि एकत्रितपणे त्याचा सामना केला पाहिजे, असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल तेड्रोस अढॅनोम घेब्रेयेसस यांनी काल (२३ मार्च) जिनिव्हा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येचा आढावा घेब्रेयेसस यांनी दिला. कोरोना बाधित रुग्णांचा १ लाखाचा टप्पा ६७ दिवसांमध्ये पार झाला होता. त्यानंतर ११ दिवसांत आणखी १ लाख लोकांना या रोगाची लागण झाली आणि त्यानंतर अवघ्या चार दिवसात आणखी एक लाख लोकांना या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याचाच अर्थ खुप कमी वेळात या व्हायरचा संसर्ग होत आहे याची जाणीव त्यांना जगाला करुन द्यायची होती. जगातील सर्व विकसित, विकसनशील आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ अशा सगळ्या देशांना एकत्र येऊन या कठीण परिस्थितीत काम करण्याची आवश्यकता आहे. तसेच जी-२० देशांनी एकीने या संकटाचा सामना करायला हवा. जी- २० देशांची दृढ एकता आपल्याला पुढे जाण्यास आणि कोरोनाच्या रुपातील या महामारीच्या विरोधात लढायला मदत करू शकते, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या या जागतिक संकटापासून जगातील बाधित देशांनी कसे लढावे यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) ने सांगितल्यानुसार, एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते, अशी महत्त्वाची माहिती WHO ने दिली आहे. कालपासून (२३ मार्च) महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची छपाई बंद करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत वृत्तपत्र दिले जाणार नाही कारण वृत्तपत्र घरोघरी दिल्या कारणाने कोरोनाचा संसर्ग होतो अशी शंका आहे. मात्र WHO ने या शंकेचे निरसन केले आहे. अमेरिकेतील एका वैद्यकिय संस्थेने सांगितल्यानुसार, वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. संस्थेने सांगितले की, वृत्तपत्रामुळे कोरोनाचा व्हायरस पसरणे हे अशक्य आहे.

वृत्तपत्रानंतर अनेक शंका कुशंका माणसांच्या मनात येतात. वृत्तपत्र अनेकजण हाताळतात त्यामुळे त्यापासून लांब राहा. लायब्ररी किंवा सोसायटीमध्ये अनेक लोक पुस्तके, मासिके वाचतात. त्यामुळे तुम्हीही ते वाचत असाल तर लगचेच हात स्वच्छ धुवा,अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. परंतु, हा गैरसमज असून तुमच्या घरी येणारे वृत्तपत्र हे पूर्णपणे सुरक्षित आहे. वृत्तपत्र छापण्याच्या प्रक्रियेत कर्मचारीही सर्व काळजी घेत आहेत. वृत्तपत्र सॅनिटाइज केल्यानंतरच प्रेसमधून वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवले जात आहे. तसेच वृत्तपत्रांची छपाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिन्स पूर्णपणे ऑटोमॅटिक आहेत. त्यामुळे वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरस पसरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या जलसंधारण प्रकल्पांच्या सीमा निश्चितीची  प्रक्रिया पूर्ण करावी! – अब्दुल सत्तार

Aprna

… म्हणून अजित पवारांचा कोल्हापूर दौरा रद्द!

News Desk

“उच्च न्यायालय म्हणाले कनिष्ठ कोर्टात जा, FIRशिवाय सीबीआय चौकशी कशी?”

News Desk