नवी दिल्ली। प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी तुरुंगात होता. शनिवारी आर्यनची जामीनावर सुटका करण्यात आली. अशातच ऑल इंड़िया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन औवेसीने आर्यन खान प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.औवेसीने म्हटले की, ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्या मुलाला जामीन मिळतो. महाराष्ट्रात दलित आणि मुसलमानांच्या विरोधात ट्रायल्स सुरू आहेत. त्याच्याविरोधात कोण बोलणार? मला या श्रीमंतांशी घेणं-देणं नाही, परंतु श्रीमंत असेल तरच न्याय मिळतो का? असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी उपस्थित केला आहे.अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 26 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला. तुरुंग प्रशासनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आर्यन तुरुंगामधून बाहेर आला आहे. आर्यन जेलमधून घरी आणण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला होता.
जामिनावर अंतिम निर्णय दिला
मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय.
आर्यन खानसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?
वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.