मुंबई। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची तुलना भाजपचे अंगवस्त्र म्हणून केली आहे. भाजपच्या यशस्वी वाटचालीमागचे सूत्रधार मियॉ असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. जनाब संजय राऊत एमआयएम की मोहब्बत कौन है? असा सवाल पडळकरांनी राऊतांना केला आहे. हिंदुत्वामुळे निर्माण झालेल्या युतीच्या जीवावर निवडून आले आहेत हे संजय राऊत विसरले असतील असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. पडळकर यांनी म्हटलं आहे की, हिंदुत्वामुळे निर्माण झालेल्या युतीमुळेच निवडून आले हे जनाब संजय राऊत कदाचित विसरले असतील. त्यांनी ओवेसेंची तुलना भाजपचे अंगवस्त्र म्हणून केली आहे. परंतु याच ओवैसींना अलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या ईदीचा नजराना यांनी पेश केला आहे. इतकेच काय तर शिवसेनेनं अमरावतीमध्ये सुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. आता जनाब संजय राऊत एमआयएमकी की मुहब्बत कौन है? हे महाराष्ट्रातील जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
#ओवीसीला आलिंगन घालून मालेगाव व अमरावतीत सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला होता.आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’हे #महाराष्ट्राला माहितीये.#महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि कोलांट्या उड्या मारता.हे रोजच मनोरंजन बंद करा.@rautsanjay61 @ShivSena @SaamanaOnline pic.twitter.com/HQxNRGNKdJ
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 27, 2021
शर्जीलवर कारवाई करण्याची हिंमत नाही
योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगी बघून घेतील. कारण ते सक्षम नेते आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये हिंदूंना शिव्या घालणाऱ्या शर्जिल उस्मानीवर कारवाई करण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे. अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही आहे. महाविकास आघाडीचे मदारी डमरु वाजवतात आणि त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही कोलंट्या उड्या मारता त्यांचे मनोरंजन करता याच मनोरंजनाच्या खेळाचा महाराष्ट्रातील जनतेला किळस आलाय त्यामुळे हे मनोरंजन बंद करा अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.