HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नाना पटोलेंनतर विधानसभा अध्यक्ष कोण? विधिमंडळ सल्लागार समितीची आज होणार बैठक

मुंबई | नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवीन विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज (२५ फेब्रपवारी) विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक मुंबई विधान भवन याठिकाणी होणार आहे. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक यावर निर्णय होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांसह विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही अत्यंत महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रद्वारे राज्य सरकारला विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत विचारणा केली असल्याचे समजते. सूत्रांची अशी देखील माहिती आहे की, याबाबत तूर्तास तरी राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. यावेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने सत्ताधारी बाकावरील लोकांना त्यांचे आमदार फुटणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे त्यांची मतं फोडण्यासाठी विरोधी पक्ष आग्रही असणार आहे.

Related posts

फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना दिलेल्या धमक्यांचे व्हिडिओ बाहेर काढायला लावू नका, धनंजय मुंडेंचा फडणवीसांना इशारा

News Desk

राज ठाकरे आज मुंबईतील सभेतून प्रचाराचा नारळ फोडणार

News Desk

काळू नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

News Desk