HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेवर निवृत्त सदस्यांची पुन्हा वर्णी लागणार का?

नवी दिल्ली | राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर या सरकारची ताकद पाहणारी राज्यसभेची पहिली निवडणूक पुढच्या काही दिवसात जाहीर होणार आहे. गेल्या अनेक काळापासून राजकीय समीकरणे बदलत आहेत. या बदलत्या समीकरणाच्या आधारे आता राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या सात जागा २ एप्रिल २०२० ला रिक्त होणार असून त्या जागांवर नवीन नियुक्त्यांसाठीची निवडणूक फेब्रुवारी अखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. निवृत्त होणाऱ्या ७ सदस्यांची नावे अनुक्रमे राष्ट्रवादीचे शरद पवार माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे.

मात्र, निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार, रामदास आठवले यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण उरलेल्यांपैकी कोणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला नव्याने संधी मिळणार याची उत्सुकता आहे. राज्यसभेवर वर्णी लागण्याच्या यादीत भाजपकडून उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, विजया रहाटकर, हंसराज अहिर यांचा समावेश असून काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदेंना यांना यावेळी संधी मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना संधी मिळणार का याचीही उत्सुकता असेल. महाराष्ट्रातून एकूण १९ खासदार राज्यसभेवर जातात. दर दोन वर्षांनी ७, ६ आणि ६ अशा जागा रिक्त होतात. ६ वर्षांपूर्वी जेव्हा ७ जागांसाठी निवड झाली होती ती बिनविरोध निवड झाली होती. आता या वेळेसही निवडणूक बिनविरोध होणार काकी उमेदवारांच्या रांगेत भर होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चांद्रयान-२’ने पार केला महत्त्वाचा टप्पा, भारताची चंद्राच्या दिशेने आगेकूच सुरू

News Desk

“बेळगावमध्ये मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव” फडणवीस

News Desk

‘ते’ वक्तव्य चुकीचे, आमचा निषेध ! चंद्रकांत पाटलांकडून घरचा आहेर

News Desk