HW News Marathi
महाराष्ट्र

विठ्ठल पुजेचा मान कुणाला मिळणार?

मुंबई | मराठा मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाल्यामुळे आषाढी एकादशी निमित्त पंढपूर येथे होणा-या विठ्ठलाच्या शासकीय महापुजेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या पुजेला पंढरपूरमध्ये उपस्थित न रहाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा विठ्ठलाची पूजा कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पांडुरंगाची पूजा ‘मानाचे वारकरी’ करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच पालकमंत्री आणि जिल्हाधिकारीही या पूजेला उपस्थित राहतील, असेही आवर्जून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीची परंपरा 700 वर्षांपासून आहे. या वारी परंपरेला छत्रपती शिवाजी महाराज यांनीही सरंक्षण दिले होते. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात येऊ देणार नसल्याची भूमिका मराठा समाजातील आंदोलकांनी घेतली आहे. त्यानंतर, पंढरपूरमधील वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन मी विठ्ठल पूजेला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच मी पूजेला जाणार नाही, पण माझ्या घरी विठ्ठलाची पूजा करेन, असेही फडणवीस यांनी म्हटले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, आव्हानांवर मात करुया! – मुख्यमंत्री

Aprna

MPSCExam : विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होतंय, फडणवीस सरकारवर भडकले

News Desk

आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, राज्यातील जनतेच्या वाटेला काय येणार?

Aprna
महाराष्ट्र

हरणाच्या मटनाची अवैध विक्री

News Desk

किन्होळा | चिखली तहसील अंतर्गत येणा-या किन्होळा येथे रविवारी 11 च्या सुमारास गावाजवळून अंदाजे 500 मीटर अंतरावर काही लोक एका शेतात काळविट आणि हरिण पकडून यांचे मटन विक्री करत आहे अशी गुप्त माहिती विजय भीकाजी भोसले वनपाल डोंगर खंडाळा , व्ही. बी. सावळे वनमजुर डोंगर खंडाळा , पी. एस. सावळे वनपाल डोंगर शेवली , शेख जाफर वाहन चालक यांना मिळाली. ते किन्होळा येथे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहचताच त्या ठिकाणी 2 लोक होते वनाधिका-यांना पाहताच मास विक्री करणारे लोक सदर ठिकाणावरुन जंगलात पळून गेले. त्यांचा पाठलाग वन अधिका-यांनी केला परंतु त्यांना पकडण्यात अधिका-यांना अपयश आले आहे.

त्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. एका काळविटाचे संपूर्ण मांस विकले गेले होते. त्याचे केवळ मुंडके राहिले होते तर दूसरे हरिण मृत अवस्थेत होते. त्याचे देखील मटन विकायची तयारी सुरु होती परंतु वनाधिकारी येताच एक हरण राहिले. त्या ठिकाणी काही पारधी लोक दररोज येत होते असे गावातील नागरिक सांगत होते. नंतर एक मृत हरिण आणि एका काळविटाचे मुंडके तसेच माप तराजू जमा करुण वनाधिकारी बुलडाणा येथे तपासणीसाठी घेऊन गेले. या ठिकाणी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. या पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी जी. पी. टेकाळे करणार असल्याचे वनपाल अधिकारी विजय भीकाजी भोसले यांनी सांगितले.

Related posts

शिवसेनेच्या गुजराती मेळाव्याच्या भूमिकेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी!

News Desk

भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तरप्रदेश, बिहार रामभरोसे – नवाब मलिक 

News Desk