HW News Marathi
महाराष्ट्र

“आता कुणाला काय CD लावायची, ती लावावी”, भाजपचे खडसेंना थेट आव्हान

मुंबई । “आता कुणाला काय CD लावायची, ती लावावी”, असा बोचरा टोला लगावत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिले आहे. एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण, एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी नेते गिरीश चौधरी यांच्यावर ED ने कारवाई सुरू केली आहे. भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच कारवाईच्या पार्श्वभूमीवर, आता भाजपने पुन्हा एकनाथ खडसे यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. मोठ्या संघर्षानंतर अखेर भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, “तुम्ही ED लावलीत तर मी CD लावेन.” आता एकनाथ खडसेंच्या याच विधानावरून भाजपने मोठे आव्हान दिले आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ED ने कारवाई सुरू केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “आता कुणाला काय सीडी लावायची, ती लावावी.” खडसे यांच्यासाठी हा मोठा इशारा आहे.

अतुल भातखळकर यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, “भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आताच्या सत्ताधाऱ्यांनीच सुरु केली होती. त्यामुळे ईडी आता याप्रकरणाचा तपास करत आहे. मुळात कर नाही त्याला डर कशाला?” , अशी विचारणा देखील अतुल भातखळकर यांनी केलो आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री महाराजांचा जयजयकार करतात तर महाराष्ट्राचे सत्ताधारी… नितेश राणेंचा पुन्हा हल्लाबोल

News Desk

प्रकाश जावडेकर यांच्या आईचे निधन

News Desk

मला कोरोना ईडीची तारीख पाहून झाला नाही, खडसेंवर गिरीश महाजनांची बोचरी टीका

News Desk