HW News Marathi
महाराष्ट्र

‘ए भाई’ अमृता फडणवीस मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांवर का भडकल्या ?

मुंबई| महाराष्ट्रात सध्या परमवीर सिंग यांच्या लेटरने गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालाय,परंतु राजीनामा होणार नाही असा निकाल पवारांनी कालचं दिला.दुसरीकडे महाविकासआघाडीचे पक्ष भाजपचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं.

भाई जगताप नेमकं काय म्हणाले ?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत ‘राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं’ असा थेट सवाल विचारला.

अमृता फडणवीसांनी काय उत्तर दिलं ?

भाई जगतापांच्या सवालाने व्यथित झालेल्या अमृता फडणवीसांनी जगताप यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.त्यांनी ट्विट केले आहे की, ‘ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !

पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय !’

भाई जगतापांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत तसेच सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही, असंही त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या.त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तो ‘माय का लाल’ समाधान आवताडे, पडळकरांचा अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याला टोला

News Desk

“तुम्हाला अडचण असेल तर….”, मुख्यमंत्र्यांवरच्या गंभीर आरोपावरुन शिवसेनेचा कॉंग्रेसला पलटवार

News Desk

फडणवीस बरे व्हावे म्हणून तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो – संजय राऊत

News Desk