HW Marathi
Covid-19 पुणे महाराष्ट्र राजकारण

पुण्यात लॉकडाऊनमध्येच कोरोनाबाधितांचा आकडा का वाढला ? महापौरांनी सांगितले कारण  

पुणे | राज्यात अनेक दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईसह, पुण्यातील कोरोनाची स्थितीसुद्धा गेल्या काही दिवसांत अधिक चिंताजनक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात सुरु असलेला १० दिवसांचा लॉकडाऊन आज (२३ जुलै) संपला आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या काळातच पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाण वाढला आहे. त्याचप्रमाणे, लॉकडाऊनच्या पुढे काय ? पुण्याला लॉकडाऊनचा नेमका किती फायदा झाला ? पुणे महानगरपालिकेचे पुढचे पाऊल काय असणार ? अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांनावर एच.डब्ल्यू. मराठीने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा केली आहे.

पुण्यात लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले कि, “लॉकडाऊनचा निर्णय हा केवळ पालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन स्वतंत्रपणे घेत नाहीत. तर राज्य सरकारकडूनही तसेच स्पष्ट निर्देश आलेले असतात. त्याचप्रमाणे, लॉकडाऊनमध्येच कोरोनाबाधितांची संख्या वाढली असेही आपण म्हणू शकत नाही. कारण, गेल्या काही दिवसांत पुणे महापालिकेने टेस्टिंगचे, अँटिजीन रॅपिड टेस्टिंगचे प्रमाण वाढवले आहे. आजही देशात सर्वात जास्त टेस्टिंग करणारे शहर पुणे आहे. त्यामुळे टेस्टिंगचे प्रमाण वाढल्याने आपल्याला पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे”, असे मुरलीधर मोहोळ यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

पुण्याला लॉकडाऊनच फायदा झाला का ?

“अगदी सुरुवातीच्या ४ लॉकडाऊनमध्ये पुणेकरांनी सर्व नियमांचे अगदी तंतोतंत पालन केले. मात्र, जेव्हा शिथिलता आणून फक्त कंटेन्टमेंट झोन वगळता बाकी ९७% पुणे अनलॉक करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच मी विरोध केला होता. अनलॉक टप्प्याटप्य्याने झाले पाहिजे. सगळंच एकत्र सुरु केल्याने त्याचे परिणामही पाहायला मिळाले. मात्र, माझ्यामते आता लॉकडाऊन करून जीवजीवन विस्कळीत करणे हा आपल्यासाठी चांगला पर्याय ठरू शकत नाही. कोरोनाचा संसर्ग आता कोणत्या कंटेन्टमेंट झोनपुरता मर्यादित नाही तर शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगायला सुरुवात करून, कोरोनाला हरवून आपल्याला आता आपले जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असेही मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले.

पहा, संपूर्ण मुलाखत

 

Related posts

गडकरींनी घेतली सलमानची भेट

News Desk

कोल्हापूरमधील काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर ?

News Desk

अपयश लपण्यासाठी हा छाती बडवण्याचा प्रकार आहे…

News Desk