HW News Marathi
महाराष्ट्र

“सरकार वाझेंना का पाठिशी घालतंय?”, फडणवीसांचा सवाल  

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरुन अधिवेशनात सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंना सस्पेंड करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या मागणीवर भाजप प्रचंड आक्रमक आहेत. वाझेंना हटवण्याचं गृहमंत्र्यांनी अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत कबूल केलं, परंतु नंतर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी निर्णय बदलल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केला. सरकार वाझेंना का पाठिशी घालतंय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर आज(९ मार्च) माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी फडणवीस यांनी, सचिन वाझे यांना अटक झाली तर सरकारमधल्या कोणा कोणाची नावं समोर येतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार सचिन वाझेला पाठिशी घालत असून सभागृहापेक्षा हा अधिकारी मोठा का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, विरोधी पक्षनेत्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही घाबरणाऱ्यातले नाही व सत्य बाहेर आणल्याशिवाय मी राहणार नाही, असं देखील फडणवीस म्हणाले. त्यामुळे सचिन वाझेंना अटक होणार का? नेमकी या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

मनसुख हिरेन यांची जी हत्या झाली त्याबद्दलचा त्यांच्या पत्नीचा जबाब मी आज सभागृहात वाचून दाखवला. ज्यामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. मनसुख हिरेन यांची जी गाढी स्फोटकं ठेवून, घटनेकरिता वापरण्यात आली होती. ती गाडी नोव्हेंबरपासून ५ फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, असं स्पष्टपणे त्यांच्या पत्नीने सांगितलं. एवढंच नाही तर त्यांचा तपास हा केवळ सचिन वाझे यांनी केला आणि तीन दिवस रोज ते सचिन वाझे सोबत सकाळी जायचे व रात्री यायचे, हे देखील त्यांच्या पत्नीने सांगितलं आहे. अशी देखील माहिती यावेळी फडणवीस यांनी माध्यमांना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दुकानांच्या वेळा आणखी चार तासाने वाढवणार’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल!

News Desk

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू

News Desk