HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार?, सोमय्या दापोलीकडे रवाना

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेते व मंत्री यांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी आक्रमक झाले आहेत. तर शिवसेनेचे नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यासाठी किरीट सोमय्या आधीपासूनच इशारा देत होते. त्यानंतर आज (26 मार्च) किरीट सोमय्या अनिल परब यांचा रिसॉर्टवर हातोडा मारण्यासाठी दापोलीकडे रवाना झाले आहेत. दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्टची सोमय्या पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर परबांचे रिसॉर्ट अनधिकृत असताना देखील अद्याप त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, याबाबत ते प्रशासनाला सवाल करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

किरीट सोमय्या हे परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी दापोलीकडे रवाना झाले असून यावेळी त्यांनी आपल्या सोबत एक मोठा प्रतिकात्मक हातोडा देखील घेतला आहे. सरकारमध्ये जो घोटाळेबाज त्यांच्या अनधिकृत बांधकाम वसुलीचा पैसा आणि त्याचे फाइव्ह स्टार हॉटेल, फाइव्ह स्टार रिसॉर्ट ठाकरे यांचे माफिया सरकार करतात आणि अनिल परब यांचा रिसॉर्ट तोंडासाठी आम्ही जात आहोत, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी माध्यमांना दिली. तसेच साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा आहे असे म्हणत साडेबारा कोटी जनतेची ताकद व शक्ती ठाकरे सरकारला दाखवायला चाललो आहे, असेही सोमय्या म्हणाले. 

यावेळी किरीट सोमय्या यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे.  तब्बल दीडशे गाड्या घेऊन ते दापोलीकडे निघाले आहेत. यावेळी ते व भाजप कार्यकर्ते हे “चलो दापोली, रिसॉर्ट तोडो” अशा घोषणा रस्त्याने देत जात आहेत. दरम्यान, किरीट सोमय्यांच्या दापोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप हे पक्ष आमने सामने येण्याची शक्यता निर्माण वर्तवण्यात येत आहे. या सर्वामुळे सोमय्यांच्या या दौऱ्याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श! – उपमुख्यमंत्री

Aprna

कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर ठाणे मनपाचा मोठा निर्णय!

News Desk

दवाखाना इमारतीवर जिल्हा परिषद उमेदवाराचे जाहिराती

News Desk