HW News Marathi
देश / विदेश

उद्यापासून देशात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बंद होणार? नवे नियम लागू करण्याची मुदत आज संपणार

नवी दिल्ली | देशात सुरू असलेल्या सोशल मिडिया कंपन्या अर्थात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. केंद्र सरकारने देशात कार्यरत असलेल्या सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी ३ महिन्यांची वेळही दिली होती. ही वेळ आता 26 मे रोजी पूर्ण होत आहे. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीने या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे, 26 मेनंतर भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडिया साइट्स बंद होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 ला सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत.

सोशल मिडिया कंपन्यांना आपली वेबसाइट अथवा मोबाइल अॅपवर फिजिकल कॉन्टेक्स पर्सनची माहिती द्यावी लागेल, असेही या आदेशात म्हणण्यात आले होते. आतापर्यंत केवळ कू नावाची कंपनी वगळता इतर कुठल्याही कंपनीने यांपैकी कुठल्याही अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही.

उद्यापासून लागू होणार नवे नियम काय असतील?

आयटी अॅक्टच्या कलम 79 नुसार, त्यांना मध्यस्थ म्हणून लाइबलिटीपासून सूट मिळालेली आहे. परंतु त्यांतील बऱ्याच कंपन्या सामग्रीवर निर्णय घेत आहेत. यांत भारतीय राज्यघटना आणि कायद्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवे नियम 26 मे 2021 पासून लागू होत आहेत. जर या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, तर त्यांचे इंटरमीडिअरी स्टेटस काढून घेतले जाऊ शकते. त्या भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार, गुन्हेगारी कारवाईच्या चौकटीत येऊ शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा हल्ला करण्यासाठी हिज्बुलच्या अतिरेक्याने मला ५० हजार रुपये दिले !

News Desk

काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, एस. जयशंकर यांचे संसदेत स्पष्टीकरण

News Desk

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थाना परिसरात सापडला जिवंत बॉम्ब

Aprna