HW News Marathi
महाराष्ट्र

अफगाणिस्तानमधील पायाभूत सुविधांमध्ये मोदी सरकार गुंतवणूक सुरु ठेवणार का?; गडकरींनी दिलं उत्तर; म्हणाले…

मुंबई। तालिबानने कब्जा केल्यापासून अफगाणिस्तानमध्ये रोख पैशांची चणचण निर्माण झाली आहे. जागतिक मदत बंद आणि बँक खात्यांमधून दररोज पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, बहुतांश तालिबानी समर्थकांना अनेक महिन्यांपासून पैसेच मिळालेल नाहीत. दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथे भारतीय गुंतवणुकीबद्दल व्यापक चिंता आहे. अशा परिस्थितीत, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्रमंत्र्यांशी तेथील सद्यस्थितीवर चर्चा केल्यानंतर या युद्धग्रस्त देशात पुढील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतील. भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत. काही प्रकल्प अजूनही प्रलंबित आहेत, असे गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही तिथे एक धरण (सलमा धरण) बांधले आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील जल संसाधन क्षेत्रात काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे ठरवतील की भारत आता अफगाणिस्तानमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करेल की नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी दिले सडेतोड उत्तर

News Desk

“करेक्ट कार्यक्रम हा शब्दही चोरल्यासारखा, तो कोणाचा आहे सर्वांना माहित आहे”

News Desk

मेहबूब शेख प्रकरणावर अडचणी वाढण्याआधी राजेश टोपेंकडून राष्ट्रवादीची भूमिका!

News Desk