HW News Marathi
महाराष्ट्र

आज अधिवेशनात सावरकरांच्या अभिवादनाचा ठराव मंजूर होणार का?

मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे आणि याच निमित्ताने भाजप सावरकरांच्या अभिवादनाचा सभागृहात ठराव मांडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सावरकरांबद्दलची भूमिका परस्परविरोधी असल्यामुळे सभागृहात आज गदारोळ होण्याची शक्यता आहे. तसेच मराठी सक्तीचे विधेयक ठाकरे सरकारकडून आणले जाण्याची शक्यता आहे.

काल (२५ फेब्रुवारी) सरपंच निवडीचा ठराव दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला. आता सरपंचाची निवड सदस्यानंमधूनच निवडला जाणार आहे आणि त्यामुळे गावातील अनेक प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. तसेच विरोधी पक्षाने काल पुन्हा प्रथेप्रमाणे शेतकऱ्यांची मागणी आणि महिला सुरक्षा या मुद्द्यावर आंदोलन केले. संपूर्ण राज्यभरात भाजपने मोर्चे आणि आंदोलने केली. तसेच, विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या महिला आमदारांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. आज नेमकी कोणता ठराव मंजूर करणार आणि भाजप आज तरी अधिवेशन चालू देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी आणि शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, राऊतांचा सवाल

News Desk

मुंबईत अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या नागरिकांच्या तक्रारी

News Desk

मुसलमानांविरोधात संभाजी भिडेंनी केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

Aprna