HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी सुरु?

नवी दिल्ली | निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असणाऱ्या प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर काल (१३ जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीतील मोठा तपशील बाहेर आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आगामी राष्ट्रपती बनविण्यासाठी पीके म्हणजे प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

प्रशांत किशोर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याचं सुत्रांकडून सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार करण्यासाठी पीके यांचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. २०२२मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची आतापासूनच शोधाशोध सुरू आहे. अशात प्रशांत किशार यांच्या मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी अनेक चर्चांना टीचकी देणाऱ्या आहेत.

नवीन पटनायक साथ देतील का?

प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या राजकीय गणितानुसार विरोधी पक्ष एकत्रित आल्यास इलेक्टोरल कॉलेजमध्ये विरोधक सरकारच्या समोर मोठं आव्हान उभं करू शकतात. त्यातही बीजेडी नेते नवीन पटनायक त्यांच्यासोबत आल्यास विरोधकांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा होणार आहे.

तामिळनाडू आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे विरोधकांचं संख्याबळ वाढण्याची चिन्हे आहेत. केवळ ओडिशामध्येच विरोधकांना आकडा जुळवताना नाकीनऊ येताना दिसत आहेत. मात्र, शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार झाल्यास पटनायक पवारांना मदत करण्याची दाट शक्यता आहे. पटनायक कुटुंबीयांशी पवारांचे जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पवारांसाठी पटनायक कुटुंब उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, किशोर यांनी याबाबत पटनायक आणि स्टॅलिन यांचीही भेट घेतली आहे.

या नेत्यांशी प्रशांत किशोर यांचे चांगले संबंध

प्रशांत किशोर यांचे ममता बॅनर्जी, जनग रेड्डी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे या नेत्यांना एकत्रित आणण्यास पीकेंना काहीही अडचण होणार नाही. काल पीके यांनी काँग्रेसच्या नेत्यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यात विविध राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवार खरचं राष्ट्रपती होणार का? हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्तव्यपथावरील संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १४ विद्यार्थ्यांचा सराव

Aprna

“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, मिटकरींचा थेट फडणवीसांवर निशाणा 

News Desk

एस.सी – एस.टी कायद्या विरोधात आझाद मैदान येथे धरणे आंदोलन

News Desk