HW News Marathi
Covid-19

उदयनराजेंच्या शपथीदरम्यान झालेला ‘तो’ प्रकार व्यंकय्या नायडूंसह भाजपला भोवणार ?

नवी दिल्ली | भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (२२ जुलै) राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. यावेळी इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर उदयनराजेंनी “जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी”, अशी घोषणा दिली. त्यानंतर, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली आणि याचेच गंभीर पडसाद आता महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत. व्यंकय्या नायडू आणि भाजपच्या विरोधात आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मोठे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी जय शिवाजी’ असे लिहून २० लाख पत्र पाठविण्यात येणार आहेत. या घटनेने राज्यातील वातावरण ढवळून निघालेले असताना भाजपने पक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेबद्दल ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनही भाजपच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे ब्राम्हण महासंघाने देखील व्यंकय्या नायडू यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी केले आहे. “उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि भाजपने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी. त्याचप्रमाणे, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे नायडू माफी मागत नाहीत, तोपर्यंत उदयनराजेंनी राज्यसभेच्या कामात भाग घेऊ नये”, असे भूमिका ब्राह्मण महासंघाने म्हटले आहे.

व्यंकय्या नायडू उदयनराजेंना काय म्हणाले ?

भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा दिल्यानंतर व्यंकय्या नायडू म्हणाले कि, “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत नाही तर माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतले जात नाही. सभागृहात अशा कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. तुम्ही नवीन सदस्य आहेत. त्यामुळे भविष्यात हे लक्षात ठेवावे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर सर्वाधिक

News Desk

राज्याचा रिकव्हरी रेट ९०. ३१ टक्के झाला

News Desk

राज्यात कोरोना रुग्णांचा कहर, आजही २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

News Desk