मुंबई। आरेतील वृक्षतोडीवरुनहीमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली. आरेतील शेकडो झाडे कापली, न्यायालये देखील सरकारला साजेसे असे निर्णय देत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत मग ते आरेतील झाडांची कत्तल का थांबवू शकले नाही? सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करु या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. आरेतील झाडे कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का? आम्हाला मूर्ख समजता का? असे राज ठाकरेंनी म्हटले.
सरकारशी संगनमत करून सर्वोच्च न्यायालायचे कसे काम चाले, असाल सवाल राज ठाकरेंनी उपस्थिती सर्वोच्चन न्ययालायच्या कामकाजावर ताशेरे ओडले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्री आरेतील झाडे तोडण्याचा निर्णय दिला. कारण, न्यायालयाला शनिवार आणि रविवारी सुट्टी असेत. हे घडण्यामागेच कारण म्हणजे या सर्वाना जाब विचारणार कोणीही नाही म्हणून या गोष्टी घडत असल्याचे ते म्हणाले.
आरेतील शेकडो झाडे कापली, न्यायालये देखील सरकारला साजेसे असे निर्णय देत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत मग ते आरेतील झाडांची कत्तल का थांबवू शकले नाही? सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करु या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला. आरेतील झाडे कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का? आम्हाला मूर्ख समजता का? असे राज ठाकरेंनी म्हटले.
निवडणुकावर बहिष्कार टाकावा
मी देशातील सोनिया गांधीनापासून ते ममता बॅनर्जी ते शरद पवारांना देखील भेटलो. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट विरोधात सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीवर बहिष्कार घालावा, हा मुद्दा मी राज्यातील नेत्यांना पण सांगितला, मात्र, बहिष्कार घालणे हे काही नेत्यांना पटले नाही. आम्ही सर्व विरोधी नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषदेत घेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविरोधात मोर्चा काढू असे ठरविले होते. दरम्यान पावसामुळे महाराष्ट्रताली कोल्हापूर आणि सांगलीत महापूर परिस्थितीमुळे मोर्चा राहुल गेला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.