HW News Marathi
महाराष्ट्र

मोतीलाल व्होरा यांच्या निधनाने अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व हरपले ! | बाळासाहेब थोरात

मुंबई | “काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी वाहून घेतले होते. शेवटपर्यंत ते काँग्रेस विचारासाठी जगले. त्यांच्या निधनाने पक्षाने अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व गमावले आहे”, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभवना व्यक्त केल्या आहेत.

मोतीलाल व्होरा यांनी आपली कारकिर्द पत्रकार म्हणून सुरु केली होती. १९६८ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९७० मध्ये त्यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक लढवून विजय संपादन केला तर १९७७ आणि १९य मंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपालपद भूषवले. १८ वर्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळली.८० मध्ये पुन्हा विजय संपादन केला. त्यांनी २ वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष, केंद्री

मोतीलाल व्होरा हे राज्यसभेचे सदस्यही होते. पक्ष संघटनेतील विविध पदांची जबाबदारीही त्यांनी य़शस्वीपणे पार पाडली. कालच त्यांनी ९३ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. व्होरा यांना श्रद्धांजली अर्पण करुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्होरा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यातील हाफ हिल मेरेथॉनमध्ये एका धावपटूचा मृत्यू

Aprna

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 25 ग्रेस मार्क

News Desk

वाधवान कुटुंब महाबळेश्वरला कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने गेले, सीएम आणि गृहमंत्र्यांना फडवीसांचा सवाल

News Desk