HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : धक्कादायक ! पुण्यात ४ तासांत ४ जणांचा मृत्यू

पुणे | आज (१४ एप्रिल) पुण्यात ४ कोरोनोबाधितांचा मृत्यू झाला. केवळ च४ तासांमध्ये यांचा मृत्यू झाला असून पुण्यात कोरोनामूळे मृत झालेल्यांची संख्या ३८ वर गेली आहे. या सगळ्यांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे माहितीही दिली आहे.

 

आज मृत्यू झालेल्यांपैकी ५० वर्षीय महिलेला रक्तदाबाचा त्रास होता, २७ वर्षीय तरुणाचे यकृत मद्यसेवनाने आधीच निकामी झाले होते, ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला रक्तदाब आणि किडनीचा आजार होता तर ४० वर्षीय महिलेला दमा आणि मधुमेहाचा आजार होता. आज दिवसभरात तासाभराच्या अंतराने या चौघांचा मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे, तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही – नवाब मलिक

News Desk

राज्यात ‘कोरोना’बाधितांची संख्या ११६ वर, सांगलीतील एकाच कुटुंबातील ५ जणांना संसर्ग

swarit

शरद पवारांच्या मनधरणीसाठी देशमुखांनी २ कोटी मागितले!

News Desk