HW News Marathi
Covid-19

नागपुरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता जात असाल तर सावधान

नागपूर | देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये ७२ दिवसांनी शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. आजपासून (५ जून) दुकाने, बाजार सुरु होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपुरात मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी गेल्यास कारवाई केली जाणार आहे. नागपुरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

मास्क न घालता कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी वावरता येणार नाही आहे. आणि तरीही मास्क न घालता गेल्यास सुरुवातीला त्यांच्याकडून २०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. तीन वेळा जर एखाद्या व्यक्तीवर मास्क न घातल्यामुळे दंड वसूल केला असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.

तुकाराम मुंढेंनी दिलेल्या आदेशानंतर आजपासून नागपूरात मॉर्निंग वॉक, खरेदी, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.कोरोनाला आळा घालण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. राज्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मास्क घालणे सक्तीचे केले आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीतही मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेड्सचे नियंत्रण एकाच छत्राखाली आणा : महापौर मुरलीधर मोहोळ

News Desk

महाराष्ट्रात आज ३००७ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंळातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह ..एकनाथ शिंदेंना कोरोनाची लागण !

News Desk