HW News Marathi
महाराष्ट्र

सावधान! स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंगच

मुंबई | बलात्काराच्या विनयभंगाच्या अनेक घटना राज्यात, देशात घडताना दिसत आहेत. दरम्यान, याच संदर्भात एक महत्नाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं ठरवत औरंगाबाद सत्र न्यायालयानं एका माणसाला अर्थात त्याला रोड रोमियोच म्हणावं लागेल तर या रोड रोमिओला ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तरुणींना तसेच लहान मुलींनाही अशा सडकछाप रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावं लागतं. अनेकदा मुली कुणालाही न सांगता, गुपचूप हा त्रास सहन करतात. मात्र औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या या निकालामुळं अशा पीडित मुलींना बळ मिळणार आहे. पुढे येऊन तक्रार केली तर अशा रोड रोमिओंना कायदेशीर मार्गानं धडा शिकवता येतो, हेच या निकालानं स्पष्ट केलं आहे.

काय घडले होते?

एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला छळत असलेल्याचा आरोप ठेवत साल २०१७मध्ये या आरोपीला अटक करण्यात आली होती. ही मुलगी शाळेत जात असताना हा आरोपी सतत तिचा पाठलाग करायचा. तसेच तिच्या नजरेत येण्यासाठी सतत तिच्या घरासमोरील बगीच्यात बसून ती सायकल चालवत असताना तिला एकटक पाहत बसायचा. एकदा ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली होती. तेव्हा तिथंही या रोड रोमिओनं तिथंही तिची पाठ सोडली नाही. तेव्हा मामानं आपल्या मित्रांनी मदतीनं या रोड रोमिओला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

कोर्टात काय झालं?

औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान आणि ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या खटल्यात एकूण ६ साक्षीदारांनी कोर्टात दिलेल्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानुसार या अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबादचे विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दामोदर राबडा या रोड रोमिओला 6 महिने सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उल्हासनगर स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार!’

News Desk

धनगर आरक्षणाच्या आंदोलकांची प्रकृती खालावली

News Desk

राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते फडवीसांच्या भेटीला, राष्ट्रवादी-शिवसेना नाराज!

News Desk