HW Marathi
महाराष्ट्र

महिलांना स्व-संरक्षणाचे धडे

मुंबई | सध्याचा काळ हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत कठीण काळ आहे. महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. महिलांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत भैरी भवानी एंटरप्राइजतर्फे नुकतेच महिला कर्मचाऱ्यांना स्व-संरक्षणाचे धडे देण्यात आले. जय हिंद अकॅडेमीचे निवृत्त जवान रक्तकर्ण महेश नरवडे यांच्यामार्फत हे धडे देण्यात आले. यावेळी भैरी भवानी एंटरप्राइजचे अध्यक्ष गंगाराम सनगले तसेच कंपनीचे सीईओ श्रेयस सनगले आदी मान्यवर उपस्थित होते.

भैरीभवानी एंटरप्राईज ही दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. निव्वळ व्यवसाय न करता विविध सामाजिक उपक्रम राबविणारी उद्योजकीय संस्था म्हणून देखील भैरीभवानीचे एक वेगळे अस्तित्व आहे. याच सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून भैरीभवानीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्व-संरक्षणाचे धडे दिले. हे प्रशिक्षण जय हिंद अकॅडेमीचे निवृत्त जवान रक्तकर्ण महेश नरवडे यांनी दिले. तसेच प्रथोपचार आणि सीपीआरचे प्रशिक्षण देखील यावेळी इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आले. महेश नरवडे हे सैन्यातील निवृत्त जवान असून त्यांना सैन्याचा 16 वर्षे आणि काश्मीर मधील राष्ट्रीय रायफल या तुकडीचा 3 वर्षांचा अनुभव आहे ते सैन्यातील क्विक रिऍक्शन टीमचे नेतृत्व करत.

स्त्रियांनी स्वत:जवळील वस्तू जसे कात्री, सेफ्टी पिन, हेअर क्लिप, डिओ स्प्रे, एटीएम कार्ड यांचा स्वसंरक्षणासाठी कसा वापर करावा. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने सोसायटी मधील सुरक्षा कशी वाढवावी. ११२ इंडिया सारखे सेफ्टी ऍपची माहिती देखील महेश नरवणे यांनी यावेळी दिली.

“महिला सक्षमीकरणास आमची संस्था नेहमीच प्राधान्य देते. त्यादृष्टीने काही उपक्रम देखील राबवितो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना दिलेले स्व-संरक्षणाचे धडे. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यात देखील भैरी भवानी एंटरप्राईज विविध उपक्रम राबवित राहील”, असे भैरी भवानी एंटरप्राइजचे अध्यक्ष गंगाराम सनगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधिमंडळाच्या नेत्यांची होणार बैठक

News Desk

पंचायत समिती उपसभापतींचे दालन बनले पैशांचा अड्डा

Gauri Tilekar

अनंत चतुर्दशीला गणेशाचे विसर्जन का?

News Desk