HW News Marathi
Covid-19

बीडमध्ये मिशन १००% ग्रीन झोनसाठी काम सुरु !

बीड | “बीड जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाला असला तरीही जिल्हा मिशन 100% ग्रीन झोनमध्ये जाईल . कोरोनाचा प्रादुर्भावापासून जिल्ह्याला वाचवण्यासाठी निर्णय घेतले जात असून लोकभावनेसोबतच जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याला महत्व दिले जात आहे “, असा विश्वास बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. “संचारबंदीच्या काळात अकरा शहरातील नागरिकांना किराणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने निडली ॲप सुरू केले असून पुढे याद्वारे जीवनावश्यक वस्तू देखील लोकांना पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध केली जाईल”, अशीही माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे यावेळी म्हणाले कि, “जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे. बदलत्या परिस्थितीत सर्व बाबींचा विचार करून पावले टाकली जात आहेत. लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात व संसर्ग येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यासाठी 9000 पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत. व्हेंटिलेटर खरेदीेतील अडचणी दूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी”, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले

“शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने बांधावर डिझेल हा उपक्रम सुरू करण्यात येत असून सुरुवातीस असे एक सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले जात आहे. यावर डिझेल वितरणाची मिटर, किंमत दर्शवणारीे यंत्रणा असून इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्याने हे वाहन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डिझेल इंधनाचा प्रश्न सुटणार आहे. इतर जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना बीडमध्ये येण्यास परवानगी दिली जात असल्याने पोलीस यंत्रणेवरील वाढणारा ताण लक्षात घेता ५५० होमगार्ड जवानांची सेवा जिल्ह्यातील पोलीस विभागात मिळाव्या यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात आला आहे”, असेही धनंजय मुंडेंनी यावेळी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांची ‘प्रिपेड’ समाजसेवा जोरात ! शेलारांचा निशाणा

News Desk

लस मोफत म्हणूनच ते पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार ! प्रतिक जयंत पाटलांचा कौतुकास्पद निर्णय

News Desk

पालिकेने सुरू केलेला डॅश बोर्ड काम करत नसल्याच्या तक्रारी

News Desk