HW News Marathi
Covid-19

लस मोफत म्हणूनच ते पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार ! प्रतिक जयंत पाटलांचा कौतुकास्पद निर्णय

सांगली । लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे #Citizens4maharashtra या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार असल्याचा कौतुकास्पद निर्णय युवा नेते प्रतिक जयंत पाटील यांनी घेतला आहे.

आजच राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर युवा नेते प्रतिक जयंत पाटील यांनी स्वतःच्या लसीचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आपल्याला शक्य असेल तर आपणही लसीचे पैसे #Citizens4maharashtra मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून द्या. आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदतीचा हातभार लावण्याची सध्या गरज आहे असे आवाहनही प्रतिक पाटील यांनी तरुणांना केले आहे.

प्रतिक पाटील यांनी आपण देशाप्रती, राज्याप्रती असलेली जबाबदारी म्हणून ही भूमिका घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान प्रतिक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे थोरले पुत्र आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पत्रकारांनाही लवकर लस द्या”, आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट, कोरोनामुक्तांचे आकडे वाढले

News Desk

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ९७० नवीन रुग्ण,एकूण संख्या ८५ हजार ९४० वर

News Desk