HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कडक कारवाई करणार

मुंबई | कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत असताना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनापासून प्रादूर्भाव होणार नाही, असा चुकीचा दावा करुन दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करित असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

कोणत्याही उत्पादकाने कोरोनावर औषधी उपाय असल्याचा दावा करणारी चुकीची जाहिरात केल्यास किंवा नागरिकांत संभ्रम निर्माण केल्याचे दिसून आल्यास अशा उत्पादक, जाहिरातदार व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले आहे. कोरोनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक: यवतमाळमध्ये आश्रमशाळेत शिकणा-या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून हत्या

News Desk

संत गाडगेबाबांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय, राष्ट्रवादीने केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक

News Desk

मुख्यमंत्र्यांनी मी ६ जूनला भूमिका घेण्यापूर्वी समाजाचे ५ प्रश्न मार्गी लावावेत, संभाजीराजेंचा इशारा

News Desk