HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिस कर्मचारी मारहाण प्रकरणात यशोमती ठाकूर यांना न्यायालयाकडून दिलासा

नागपूर | कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली असून पोलिसांना नोटीस बजावली आहे.

ठाकरे सरकारमध्ये महिला-बालकल्याण मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या यशोमती ठाकूर यांना १५ ऑक्टोबरला ३ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना शिक्षा

झाली होती.

काय आहे प्रकरण?

यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.

अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ED ची ठाण्यात मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची संपत्ती जप्त

Aprna

भारताला आणखी एक सुवर्ण पदक!

News Desk

कोरोना काळात महाराष्ट्रात ६० कंपन्यांनी दीड लाख कोटींची गुंतवणूक केल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती!

News Desk