HW News Marathi
महाराष्ट्र

 हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये | यशोमती ठाकूर

मुंबई | काल (३० ऑगस्ट) दिवसभर सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडीओत काही तरुणांसोबत १८०० रुपयांवरुन घरकाम करणारी महिला भांडत असल्याचे दिसून आले. सोशल मीडियात अनेकांनी हा व्हिडीओ गंमतीसाठी आणि मनोरंजनासाठी शेअर केला होता. मात्र या व्हिडीओची गंभीर दखल राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने घेतली आहे.

याबाबत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये”, अशा शब्दात  यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत असंही मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले आहे. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होऊन त्या काकूंची थट्टा उडवण्यात आली.

https://www.facebook.com/1506106249633752/posts/2714146282163070/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात…”, संजय राऊत

News Desk

…म्हणून उध्दव ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांना नमस्कार!

News Desk

राष्ट्रवादीमुळे सत्तेची संधी गेलीः पृथ्वीराज चव्हाण

News Desk