HW News Marathi
महाराष्ट्र

यवतमाळमधील ‘त्या’ कोरोना संशयितांची आज होणार कोरोनाची तपासणी

यवतमाळ | कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. पुण्यात ५ जणांना कोरोनाची लागण झालेल्यांसोबत यवतमाळ जिल्ह्यातील ११ जणांनी प्रवास केल्याचे शासकीय प्रशासनाकडून उघडकीस आले आहे. दरम्यान, या ११ जणांना घरातून बाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोण आहेत हे यवतमाळवरुन आलेले प्रवासी?

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालूक्यातील ३ कुटुंबातील ११ जण २४ फेब्रुवारीला दुबईला गेले होते. १ मार्चला परत आल्यानंतर सगळ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यातील एक तरुण पुण्यात शिक्षणासाठी गेला. त्यानंतर पुण्यात दुबईहून आलेल्या दोन पुणेकरांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्यासोबत भारतातील आणखी कोणी प्रवास केला होता याचा शोध घेण्यात आला. या शोधात यवतमाळमधील हे ११ जण कोरोनाबाधितांसोबत विमानात होते हे निदर्शनास आले. त्यामुळे यवतमाळमधुन पुण्याला शिकायला गेलेल्या त्या तरुणाची पुन्हा आरोग्य तपासणी केली असता करोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले. त्यामुळे त्याच्यासोबतच्या १० जणांची आरोग्य तपासणी आज होणार असून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरत आहे.

तसेच, अहमदनगरच्या आणखी ४ प्रवाशांचा शोध महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्या सगळ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही आहेत. पण खबरदारीसाठी त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच त्यांच्या घरावर निरीक्षणही ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंनी पाळला महाविकास आघाडीचा धर्म!

News Desk

भाजपच्या ४० आमदारांची यादी तयार आहे, बच्चु कडूंचा दावा

News Desk

खडसेंनी भाजप सोडल्यानंतर उदयनराजे म्हणतात राज्याची सुत्रे ताब्यात घेण्यासाठी फडणवीसांना शुभेच्छा !

News Desk