मुंबई | तुम्ही महाराष्ट्रात आहात, चिंता करू नका, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय मंजुर आणि कांमगारांना दिला आहे. राज्यातील वाढेत कोरोना रुग्णांची संख्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती आणि वांद्रेतील परप्रांतीय मंजुरांनी स्वगृही जाण्यासाठी गेलील गर्दी याविषयांवर मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील संवाद साधला आहे.
Nobody wants that you stay in lockup without your will. Lockdown doesn't mean lockup. It is our country. You're (Migrant labourers) safe in my state&don't worry. The day when lockdown will be lifted, not only me, but Centre also will make arrangements for you: Maharasthra CM pic.twitter.com/LbUu8GwHCs
— ANI (@ANI) April 14, 2020
वाद्रेंतील घटनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उगाच कोणीतरी ट्रेन्स चालू होणार म्हणून पिल्लू सोडले. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर लोकांनी गर्दी, तुम्ही महाराष्ट्रात आहात, चिंता करू नका, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी कामासाठी मुंबईत आलेल्या परप्रांतीय मजूर आणि कामगारांना दिला. तसेच या गोरगरीब जनतेच्या भावनांनी खेळू नका आणि राजकारण करु नका. या संकटाचा कुणी गैरफायदा घेतला तर त्यांना सोडणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.
After #COVID19 outbreak ends, we will have an equally serious challenge which will be the revival of the economy in the state. Therefore, we have formed committees which will prepare the plans for its revival: Maharashtra Chief Minister Udhhav Thackeray pic.twitter.com/ArJ5AgtOvp
— ANI (@ANI) April 14, 2020
डॉ.बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला, आता आपली लढाई विषाणू सोबत आहे. सर्व आंबेडकरी अनुयायांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुक, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संबोधनातून केले आहे.कोरोनानंतर राज्याताल मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे सांगित. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केल असून आर्थिक सामना करण्यासाठी २ ग्रुपची निर्मिती केली
Maharashtra is probably doing the highest number of tests. Mumbai has tested over 22000 samples. 2334 positive cases reported till today morning. 230 people – around 10% people have recovered: Maharashtra CM Udhhav Thackeray pic.twitter.com/r0a1DjCM1M
— ANI (@ANI) April 14, 2020
आज जगभर टंचाई आहे पण वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. अनेक व्यक्ती, संस्था आपल्याला मदत करताहेत. कुणी पीपीई कीट देताहेत, कुणी व्हेटीलेटर देताहेत. वैद्यकीय क्षेत्रातील २१ हजार लोकांनी आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे असेही ते म्हणाले. आता तर या युद्धात सर्व नामवंत डॉक्टर्स आमच्या बरोबर सहभागी झाले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टर्सचा टास्क फोर्स राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संबोधणातील महत्त्वाचे मुद्दे
- महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिली आहे.
- परंप्रातंयी कामगारांच्या भावनांसी खेळू नका
- शिवभोजनाची व्यप्ती ८० हजारावर वाढली आहे. गरज भासल्यास शिवभोजनाची व्यप्ती वाढू
- कोणत्याही अफवांवर विश्वास ठेव नका
- तुम्ही महाराष्ट्रात आहात, चिंता करू नका, असा विश्वसा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे
हळूहळू सर्वच जण आपल्यासोबत येत आहेत
- ही वेळ राजकारणाची नाही, राजकारण आयुष्यभर करतो.
दुर्गम भागातील कामे कोणत्याही परिस्थिती थांबता कामा नये
- महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली, देशालाही आपण दिशा दाखवू
- कंटेन्टमेन्ट झोनमध्ये कुठेही अडथळा येणार नाही
- प्लास्मा ट्रीटमेंट आणि बीसीजी वॅक्सीनचे प्रयोग करण्यासाठी महाराष्ट्राने परवानगी मागितली आहे
- आता ही राजकारण करण्याची गरज नाही, राजकारण करण्यासाठी संपूर्ण अष्युय आहे
- २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करायचे की नाही ते ठरवू
- जीवनावश्यक वस्तूचा साठा कायम राहणार
- शेत विषयक कामे थांबवणार नाही, शेतमालाची दुकाने सुरू राहणार
- उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासाठीही एक समिती गठीत, कोरोनातून बाहेर आल्यानंतर राज्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. मात्र, आर्थिक सामना करण्यासाठी २ ग्रुपची निर्मिती केली
- राज्यातील वाढत्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स, ही टीम राज्यातील आरोग्य सेवेला पूर्ण मार्गदर्शन करणार
- महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या तर मुंबईत २०ते २२ हजार चाचण्या आहेत
- महाराष्ट्रात आतापर्यंत २३० जण कोरोना मुक्त झाले आहे
- आपण कोरोनाचा लढा गांभीर्याने घेतला आहे
- उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभार मानले
- अनुयायांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुक
- उद्धव ठाकरेंनी आंबेडकरांना अभिवादन केले आहे
- डॉ.बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला आता आपली लढाई विषाणू सोबत
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.