HW News Marathi
महाराष्ट्र

पाटलांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो, पण फटका लगावतो !

कोल्हापूर | “तुम्ही पाटलांना ओळखले नाही. चेहऱ्यावर कळत नाही, देह बोली तू कळत नाही, कसा फटका लगावतो हे समजतही नाही,” अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात चंद्राकांत पाटील बोलत होते. यावेळी पाटील यांनी पवारांवर टीका करत बंडखोरांनाही इशारा दिला.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मला कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे. पण तसे होणार नाही असे सांगून पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीधर्म पाळावाच लागेल असे निक्षून सांगितले. यावेळी भाजप शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण, “तुम्ही मला ओळखलेले नाही. चेहऱ्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो हे समजत नाही. तुम्ही माझा अनुभव घेतलेला नाही,” असे टोला चंद्राकांतांनी पवारांना लगावला.

अनेक वेळा पराभूत झालेल्या उमेदवारांना आघाडीचा पाठिंबा

कोथरुड विधानसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने विजयी होईल, असा असा विश्वास व्यक्त करून पाटील म्हणाले, ‘या मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादीने माझ्याविरोधात उमेदवार मिळाला नाही. या मतदारसंघात शरद पवार, अजित पवारांचे डायरेक्ट, इनडायरेक्ट काही तरी चालले आहे. म्हणून अनेकवेळा पराभूत झालेले मनसेचे उमेदवार अॅड . किशोर शिंदे यांना आघाडीने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मला भेटत असून ते म्हणत आहेत. आम्ही मनसेचा झेंडा का फिरवायचा. कुणाला तरी बळीचा बकरा करायचा म्हणून आघाडीने मनसेला पाठिंबा दिला आहे’.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला | भिडे गुरुजींचा आरोप

News Desk

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना दिलासा….

News Desk

मुंबईत दादर टीटी उड्डाणपूलाजवळ तेजस्विनी बसचा भीषण अपघात, ८ जण गंभीर जखमी!

News Desk