HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का? राऊतांची पाटलांवर बोचरी टीका!

मुंबई। एकदा संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत एक सेफ जागा निवडणूक लढून जिंकून येऊन दाखवावं, असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानाला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?, असं प्रत्युत्तर राऊतांनी चंद्रकांतदादांना दिलं आहे.

कोल्हापूर सोडून कोथरुडला आले

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का? मी काय करावं हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पाहावं. माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे, असं म्हणत राऊतांनी त्यांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला आहे.माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणार आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार, असंही संजय राऊत म्हणालेत.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांतदादांचं राऊतांना निवडणूक लढण्याचं आव्हान

जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी राऊतांची खिल्ली उडवत महापालिकेची निवडणूक लढवा, असं चॅलेंज राजसाहेबांच्या अंगणातूनच दिलं.जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी. मराठीमध्ये एक म्हण आहे, दंड थोपटले…. संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही पाहावी”, असा हल्लाबोल चंद्रकांतदादांनी राऊतांवर केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…तेव्हा सोनू सूद कोणाचे होते?’, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा

News Desk

राजकीय नेत्यांसंबंधी केलेलं ‘ते’ वक्तव्य बंडातात्यांना भोवलं; पोलिसांनी घेतलं ताब्यात

News Desk

ठाण्यात रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेची ‘अबोली रिक्षा’

swarit