HW News Marathi
महाराष्ट्र

५० लाखांच्या घोटाळ्यात ईडीच्या नोटीसवर तुम्ही हैराण झाला, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर पलटवार!

मुंबई। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून दिले होते. तेच पत्र संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात छापले होते. पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये ५० लाख रुपयांसाठी ईडीने नोटीस बजावल्यावर संजय राऊत हैराण झाले होते. तेव्हाच कळालं ५० लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटी रुपयांसाठी नक्कीच फेस येईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच संजय राऊत हे सातत्याने माझ्यावर टिका करून मला भरपूर प्रसिद्धी मिळवून देत असतात असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत हे शिवसेनेचे नुकसान करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अग्रलेखातून माझ्यावर चिखलफेक केली

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून माझ्यावर चिखलफेक केली. पण त्यांना उत्तर देणे प्रोटोकॉलनुसार योग्य ठरणार नाही म्हणजेच राजकीयदृष्ट्या बरोबर नाही. ज्याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणजेच विश्वासघात करणे एवढाही अर्थ माहित नाही त्यासाठी प्रोटोकॉल हा शब्द वापरला. मी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर टिका केली असती तर मी त्याला उत्तर देणे बरोबरीचे झाले असते. ते राजकारणातील प्रोटोकॉल धरून झाले असते. पण राऊतांच्याबाबतीत तसे नाही. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे

मुश्रीफांची बाजू घेताना ‘पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला? असा सवाल तुम्ही केलात. संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही किबंहुना तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. परंतु पीएमसी बँक घोटाळ्यावेळी ५० लाख रुपयांसाठी तुमची झालेली धावपळ बघून मी अंदाज बांधला जर ५० लाख रुपयांसाठी एवढा त्रास असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येईल, असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंनी काँग्रेस महासचिवांना निलंबित केलं!

News Desk

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार! –  दादाजी भुसे

Aprna

मोदींचे सरकार आले, आता अयोध्येत राम मंदिर होणारच !

News Desk