HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

पैठणच्या सभेवरुन वरुण सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले…

डॅरील मिरांडा/प्रतिनिधी

मुंबई | औरंगाबादमधील पैठण येथे सोमवारी, १२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेवरून युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार संदीपान भुमरे यांना टोला लगावला आहे.

सोमवारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबाद मधील पैठण येथे जाहीर सभा पार पडली. या सभेतून एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर हा शिंदेंचा दुसरा औरंगाबाद दौरा होता. पण, या सभेपूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांनी एक GR काढला असून सर्व अंगणवाडी सेविकांना या सभेसाठी उपस्थित राहण्यात यावे असे सांगितले होते. यावरून विरोधकांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर एक ऑडियो क्लिप सुद्धा वायरल झाली ज्यात दोन कार्यकर्ते पैसे वाटपासंदर्भात बोलत होते. त्यावरून सुद्धा शिंदेंवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. या कथित ऑडियो क्लिपमध्ये सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकाला किती पैसे वाटप करायचे? अशा आशयाचं या दोन कार्यकर्त्यांमधलं संभाषण होतं.

दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या या सभेवारून युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी टोला लगावला आहे. वरुण सरदेसाई म्हणाले, “जो व्यक्ती २५ वर्ष सलग निवडून येतो त्याला मुख्यमंत्र्यांच्या सभेला लोकांना पैसे वाटप करून गर्दी जमवावी लागते, तत्पूर्वी सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सभेला अंगणवाडी सेविकांना उपस्थित राहण्यासाठी एक GR सुद्धा काढण्यात आला. त्यात सर्वांना सभेला उपस्थित राहावे अस सुद्धा सांगण्यात आला होता”. पुढे बोलताना ते म्हणाले, “जर निवडणुका लागल्या तर जनता त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देईल असं विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केलं. सभेसाठी पैसे वाटपावरून सरदेसाई म्हणाले पैठणच्या लोकांची काही चुकी नाही जर त्यांनी ५० खोके घेतले मग आम्ही ३०० का?” असं म्हणत त्यांनी टोला सुद्धा लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे – सामना

News Desk

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ इशारानंतर राऊतांनी ट्वीटद्वारे दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Aprna

पुणे शिक्षक मतदारसंघात अखेर काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी

News Desk