HW News Marathi
महाराष्ट्र

झिशान सिद्दिकींची सोनिया गांधींकडे भाई जगतापांची तक्रार, कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुंबई | मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार केली आहे काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी. झिशान सिद्दिकी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून भाई जगताप यांच्या विरोषात गंभीर आरोप केले आहेत. माझ्याच पक्षाचा अध्यक्ष माझ्या विरोधात कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप आमदार झिशान सिद्दिकी यांनी पत्रात केला आहे. यासाठी झिशान यांनी काही घटनांचा दाखला दिला आहे. दरम्यान, यामुळे कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत वाद समोर येऊ लागला आहे.

मुंबई काँग्रेस मार्फत जनतेला टूलकिट वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यातील एक कार्यक्रम वांद्रे येथील बीकेसी पोलीस स्थानकात घेण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेस मंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते पण, वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांना बोलवण्यात आले नाही. बीकेसी पोलीस स्थानक हे आमदार सिद्दिकी यांच्या मतदारसंघात येत तिथे काँग्रेसने कार्यक्रम घेऊन स्थानिक आमदाराला बोलवलं नाही हा प्रोटोकॉल तोडणे आहे आणि हे सार्वजनिकरित्या खजील करण्यासारखे आहे असं झिशान यांनी पत्रात म्हटलं आहे.

इतकंच नाही तर, काही महिन्यांपूर्वी मुंबई युवा काँग्रेसच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत झिशान सिद्दिकीला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही असंही भाई जगताप यांनी पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचा गंभीर आरोप झिशान सिद्यकि यांनी आपल्या पत्रात केला आहे.

पक्षात माझ्या विरुद्ध काम करणाऱ्यांना ताकद दिली जाते, अशी तक्रारही झिशान सिद्दिकी यांनी पत्रात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लिहिलेलं पत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनी महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, के, सी, वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना देखील पाठवले आहे. यावर आता सोनिया गांधी काय बोलणार आणि स्वत: भाई जगताप काय बोलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार’, सेनेची केंद्र सरकारवर टीका!

News Desk

माजी मंत्री गावितांनी निवडणूक आयोगापासून लपविली माहिती

News Desk

हॉलिडे एक्स्प्रेसचे चाक तुटले, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प

News Desk