मुंबई | राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला होता. परंतु आता यातून महाराष्ट्र आणि विशेषत:मुंबई सावरताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढणारी रूग्णसंख्याही आता कमी होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को कोविड सेंटरला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं.
दरम्यान, नेस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमादकम्यान आरोग्य कर्मचारी झिगाट या गाण्यावर थिरकताना दिसले. मुंबईतील नेस्को कोविड सेंटर सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. दरम्यान,२ जून रोजी नेस्को कोविड सेंटरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी झिंगाट या गाण्यावर थिरकताना दिसले आहेत.
गेल्या दीड वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमामात ताण येत आहे. आरोग्य कर्मचारी दिवसरात्र एक करून रुग्णांवर उपचार करताना दिसत आहेत. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. नेस्कोतील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दिवसरात्र सुरू असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत. तसेच, त्यांच्या या झिंगाट डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.
#WATCH Healthcare professionals of Nesco COVID-19 center in Mumbai's Goregaon were seen showing off their dance moves inside the patient's ward during an entertainment program organised on June 2 to mark one year of operations of the center pic.twitter.com/6ET61KIgsu
— ANI (@ANI) June 3, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.