HW News Marathi
महाराष्ट्र

झूम ॲप सरकारी किंवा खाजगी वापरासाठी सुरक्षित नाही

मुंबई | राजकीय नेते, उद्योजक व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी वापरत असणारे झूम हे अ‍ॅप सुरक्षित नाही आहे. अनेक व्यावसायिकही या अ‍ॅपचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, हे अ‍ॅप सुरक्षित नसल्याची बाब राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीने (NIC) सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक जन वर्क फ्रॉम होम करत असल्याकारणाने ही बाब लक्षात आली.

दरम्यान, सरकारने अधिकृत व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी अन्य कुठल्याही अ‍ॅपपचा वापर न करण्याचा सल्ला या आधी NIC ने दिला होता.२०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CyCord हे पोर्टल जारी केले होते. त्यामूळे अन्य कोणत्याही अ‍ॅपचा वापर करणे धोकादायक ठरु शकते.

CERT च्या सल्लागारांनी सांगितल्यानुसार, अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली असल्याकारणाने हे ऑनलाईन अ‍ॅप जास्त वापरात आले. परंतू, त्यामूळे सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल झालेला फॉर्म बनावट

swarit

मोदींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा युटन

Aprna

‘मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी “ही” कोणाची जबाबदारी ?’

News Desk