HW News Marathi
महाराष्ट्र

अन्यथा मरेपर्यंत उपोषणाची परवानगी देण्याची आरोपीची न्यायालयाकडे मागणी

कल्पना गिरी हत्याकांडातील आरोपी महेंद्रसिंह चौहान याचा पाॅलीग्राफीक आणि नार्को टेस्टसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज , मागणी मान्य न झाल्यास मरेपर्यंत उपोषणाची मागितली परवानगी

रामदास पांडेवाड

लातूर – काँग्रेसची स्थानिक पदाधिकारी कल्पना गिरी हिच्या हत्या प्रकरणातील आरोपी महेंद्रसिंह चौहान याने स्वखर्चाने स्वतःची पाॅलीग्राफीक आणि नार्को-लाय डिटेक्टर चाचणी करण्याची मागणी करणारा अर्ज लातूर जिल्हा न्यायालयात सादर केला आहे. अर्जातील मागणी मान्य न झाल्यास मरेपर्यंत उपोषण करण्याची परवानगी देण्यात यावी , अशी मागणी चौहान याने अर्जात केली आहे.

21 मार्च 2014 रोजी कल्पना गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणातील आरोपी महेंद्रसिंह चौहान याने 2 जानेवारी 2016 रोजी लातूर जिल्हा न्यायालयात धाव अर्ज केला आहे. त्यात त्याने वरील चाचण्यांचा जो काही निकाल येईल तो मान्य असेल तसे शपथपत्र न्यायालयात देईल असे म्हटले आहे. या चाचण्या घेण्यात न आल्यास मरेपर्यंत उपोषणाची कायदेशीर परवानगी देण्याची मागणी महेंद्रसिंह याने अर्जाद्वारे केली आहे.

मृत कल्पना गिरी यांच्या आई पुष्पा मंगल गिरी यांनी 1 जानेवारी 2015 रोजी एका अर्जाद्वारे या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को आणि ब्रेनमॅपिंग चाचणी घेण्याची मागणी केली होती. त्यात सौ. गिरी यांनी आरोपींना 32 प्रश्न विचारण्याची मागणी केली होती. या सर्व प्रश्नांची उत्तरे या चाचण्यांमध्ये देण्याची हमी आरोपी महेंद्रसिंह चौहान याने अर्जाद्वारे दिली आहे.

याप्रकरणी आरोपीने स्वतः आणि फिर्यादी यांनीही आरोपीच्या विविध चाचण्या करण्याची मागणी अर्जाद्वारे तपासयंत्रणांकडेही केली आहे. मात्र, त्यावर तपासयंत्रणांकडून कुठलीच कारवाई झाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी ओबीसी समाजाला दुखावून काहीच करणार नाही”, संभाजीराजेंची ग्वाही

News Desk

कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल ३ तासांनी पूर्ववत

News Desk

मास्कची किंमत सर्वाधिक कमी करणारे महाराष्ट्र हे ठरले पहिले राज्य!

News Desk