HW News Marathi
महाराष्ट्र

आंध्रा प्रदेश सरकारने कुरुक्षेत्र महासभा उधळून लावले

All India MRPS समर्थक आंदोलकांची केली धरपकड

उत्तम बाबळे

नांदेड :- आंध्रा प्रदेशातील अमरावती येथे वंचित,उपेक्षीतांच्या न्याय हक्कासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण अ,ब,क,ड नूसार वर्गीकरण करण्यात यावे व आंध्रा प्रदेश सरकारने दिलेल्या वचनपुर्तीसाठी All India MRPS मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांच्या नेतृत्वाखाली ७ जुलै रोजी ” कुरुक्षेत्र महासभेचे ” आयोजन करण्यात आले होते.या आंदोलनासाठी वंचित,उपेक्षीत घटकांची येणारी मोठी संख्या पाहून आणि सरकारची नामुस्की होण्याच्या धास्तीने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हे आंदोलन उधळून लावण्याच्या उद्देशाने ६ जुलैच्या रात्री पासून आंदोलकांची धरपकड सुरु केली असून पोलीस बळ वापरुन दंडेलशाही केली आहे.या दंडेलशाहीचा विविध स्तररातून जाहीर निषेध व्यक्त होत आहे. अनुसूचित जातीतील वंचित उपेक्षीत घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वर्गीकरण अ,ब,क,ड नूसार न्याय मिळऊन देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांच्या नेतृत्वाखाली All India MRPS मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून देशव्यापी लढा सुरु आहे.नोव्हेंबर २०१६ मध्ये लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांनी परेड ग्राऊंड ,सिकंद्राबाद येथे ” कुरुक्षेत्र महासभा ” यशस्वी झाली असून या सभेस देशभरातून अनुसूचित जातीतील वंचित,उपेक्षीतांनी जवळपास १५ ते २० लाख संख्येत सहभाग घेतला होता.तेलंगणा व आंध्रा प्रदेश राज्य निर्मिती नंतर सन २०१४ मध्ये संपन्न झालेल्या विधानसभा निवडणूक समयी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांना वचन दिले होते की आमचे सरकार सत्तेवर आल्यास अनुसूचित जातीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वर्गीकरण अ,ब,क,ड नूसार न्याय मिळवून देऊ.उपरोक्त मागणीच्या अनुशंगाने व सन २०१४ मध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या आश्वासनाच्या वचनपुर्तीची आठवण करुन देण्यासाठी लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांच्या नेतृत्वाखाली ७ जुलै २०१७ रोजी अमरावती,आंध्रा प्रदेश येथे ” कुरुक्षेत्र महासभा ” आयोजित केरण्यात आले होते.तसेच विधानसभा पावसाळी अधिवेशनावर मोर्चा नेऊन निवेदन देण्यात येणार होते. अमरावती राजधानीत लाखो वंचित,उपेक्षीत येणार व सरकारची नामुस्की होणार या धास्तीने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ” कुरुक्षेत्र महासभेची ” परवानगी नाकारली.परंतू लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन सभेची व आंदोलनाची परवानगी घेतली.न्यायालयाने परवानगी दिल्याने सभा व आंदोलन यशस्वी होणार म्हणून पित्त खवळलेल्या मुख्यंमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हे आंदोलन उधळून लावण्यासाठी ६ जुलैच्या रात्री पासूनच आंदोलकांची धरपकड सुरु केली.लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांना देखील ताब्यात घेण्याचा पोलीसांनी प्रयत्न केला.परंतू ते त्यांच्या हाती लागलेच नाहीत.तसेच या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या तेलंगणा,आंध्रा प्रदेश,कर्नाटक,महाराष्ट्र राज्य व देशातून येणा-याचीही अडवणूक आणि धरपकड सुरु केली.रेल्वेतून येणा-या आंदोलकांना रेल्वेस्थानकावर,कार,जिप व आदी वाहनातून येणा-यांना टोल नाक्यांवर,पोलीसांनी अडविले.तिन व्यक्तींच्यावर एकत्र येणास बंदी घातली.दुपार पर्यंत आंध्रा प्रदेश पोलीसांनी जवळपास ३ हजार कार्यकर्त्यांना राज्यात अटक केली. महाराष्ट्रातून गेलेले All India MRPS चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शंकर अण्णा येरोला,राज्य सचिव अजित केसराळीकर,माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,नर्सिंग शिंदे आदींना अमरावती येथील टोल नाक्यावर पोलीसांनी अडविले.तसेच राज्य प्रसिद्धी प्रमुख उत्तम बाबळे,राज्य समन्वयक सतिश कावडे,यादव सुर्वयवंशी मादिगा व आदींना तेलंगणा राज्य सिमेवरच अडविण्यात आले.त्यामुळे ते परतले.अटक झालेल्यात महाराष्ट्रातील जवळपास १०० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. लोकशाही मार्गाने होत असलेले आंदोलन दडपशाहीने उधळून लावण्याचा हा प्रकार मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व आंध्र प्रदेश सरकारने केला असल्याने विविध स्तरातून जाहीर निषेध व्यक्त होत असून हैद्राबाद – विजयवाडा एक्सप्रेस हायवे व कृष्णा जिल्ह्यातील सर्व हायवे वरील वाहतुक दुपार नंतर आंदोलकांनी जाम करुन सोडली आहे.वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या असून जवळपास ५० ते ७५ हजार आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या घरावर मोठा हल्ला, ही दुर्दैवी घटना; ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Aprna

हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप!

News Desk

ईडीकडे आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? संजय राऊतांचा सवाल

News Desk