HW News Marathi
महाराष्ट्र

आयकर विभागाची नजर ..

मुंबई निवडणुकीत पैशाची देवाण घेवान मोठ्या प्रमाण होते . प्रचार दरम्यान मतदारांना पैसे दिले जातात यावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने आयकर विभागाची मदत घेणार आहे . १० महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. युती-आघाडय़ांच्या वाटाघाटीत सर्वच पक्ष गुंतले आहेत. अशा वेळी निवडणूक आयोग मात्र निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे.

निवडणूक काळात पैशांचा मोठया प्रमाणात होणारा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने आयकर विभागावर जबाबदारी सोपवली आहे. निवडणुक आयोगाने राज्य विनिमय नियामक मंडळाची स्थापना केली असून त्यात १२ आयकर अधिका-यांचा समावेश केला आहे.

हे अधिकारी बँकांचे व्यवहार, पैशांची वाहतूक यावर निगरानी ठेवून असणार आहेत. एखाद्या बँकेतील व्यवहार संशयास्पद वाटल्यास हे अधिकारी जिल्हाधिका-यांना माहिती देतील आणि जिल्हाधिकारी ती माहिती निवडणूक आयोगाला कळवतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणाचा वीजेच्या खांबावर दोन तास धिंगाणा, तारा तोडल्या

News Desk

शिवसेनेने विश्वासार्हतेचे फाटलेले ठिगळ सावरण्यासाठी शाहू महाराजांची घेतली भेट! – प्रविण दरेकर

Aprna

भाजपचा दंगली घडवण्याचा डाव होता, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

News Desk