HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची भेट न घेता संभाजी भिडे ‘मातोश्री’तून परतले

मुंबई। राज्यात सत्ता स्थापनेवरून पेच निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजव मुख्यमंत्री पदावरून ठाम भूमिका घेतली आहे. यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरूजी यांनी काल (नोव्हेंबर )अचानक मातोश्रीवर धाव घेतली. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर उपस्थित नसल्याने संभाजी भिडे यांना मातोश्रीवरून आल्यापावली माघारी परतावे लागले. मात्र, संभाजी भिडे माताश्रीवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

संभाजी भिडे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट झाली नाही. संभाजी भिडे जवळपास २० मिनिटे मातोश्रीवर थांबले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर न परतल्याने त्या दोघांची भेट होऊ शकली नाही.

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून १५ दिवस उलटले आहे मात्र, सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केलेली नाही. मुख्यमंत्री आणि ५०-५० च्या फॉर्म्युल्यावरुन घमासान सुरू आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, साधी राहणी असलेला नेता हरपला.

News Desk

एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार – अ‍ॅड. असीम सरोदे

News Desk

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार!- मंगलप्रभात लोढा

Aprna