HW News Marathi
महाराष्ट्र

कागदी घोडे नाचऊ नका ! -खा.अशोक चव्हाण 

भोकर तालुका पाणी टंचाई निवारण उपाययोजना नियोजन आढावा बैठकीत अधिका-यांना माजी मुख्यमंत्र्यांनी झापले
उत्तम बाबळे

भोकर :- भोकर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील गावांच्या पाणी टंचाई निवारणार्थ ८ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या उपाययोजना नियोजन व आढावा बैठकीत दिलेला कृती आराखडा हा प्रत्यक्ष गावपातळीवर सर्वेक्षणासाठी न जाता तयार केल्याची बनवाबनवी निदर्शनास आल्याने माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण हे संतप्त झाले व ” घरी बसून तयार केलेले कागदी घोडे नाचऊ नका ! आणि जनतेसह जनतेच्या प्रतिनिधींची दिशाभूल करु नका !म्हणत संबंधित अधिका-यांना झाप झाप झापल्याने उपस्थितांमध्ये अधिका-यांच्या बनवाबनवीचा प्रकार उघडकीस आला आहे भोकर तालुक्यातील पाळज,भोसी,पिंपळढव यातीन गटातील व पाळज,देवठाणा,भोसी,रिठ्ठा,हळदा व पिंपळढव या सहा गणातील एकूण ६६ ग्रामपंचायती अंतर्गत येणा-या १२५ वाडी तांड्यांच्या पाणी टंचाई निवारणार्थ ८ एप्रिल २०१७ रोजी भोकर पंचायत समितीच्या वतीने भोकर विधानसभेच्या आमदार साै.अमिता (भाभी) अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गावच्या सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवकांची पाणी टंचाई निवारण उपाय योजना व आढावा बैठक पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली.यावेळी जि.प.अध्यक्षा शांताबाई निवृत्ती पवार जवळगावकर,जि.प.समाज कल्याण सभापती साै.शिला निखाते, उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे,पं.स.सभापती झिमाबाई चव्हाण,उपसभापती सुर्यकांत बिल्लेवाड,जि.प.गटनेते प्रकाश देशमुख भोसीकर,जि.प.सदस्य बाळासाहेब पाटील रावणगावकर ,मंगाराणी अंबुलगेकर,दिवाकर रेड्डी ,सभापती जगदिश पाटील भोसीकर, काँग्रेस पक्ष नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांसह सर्व पंचायत समिती सदस्य व विविध कार्यालयांचे संबंधीत अधिकारी,सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती. संपन्न झालेल्या बैठकीत तालुक्यातील एकुण गावांच्या पाणी टंचाई निवारणार्थ प्रतावित आराख्यात जानेवारी ते मार्च २०१७ व एप्रिल ते जून २०१७ या सहा महिन्या करीता दोन टप्प्यात विहिर,विंधन विहीर खोदकाम व अधिग्रहण,टँकर,नुतन हातपंप व जुने दुरुस्तीस्तव २.७८ लाख रुपये निधी जिल्हाधिकारी यांनी मंजूर केल्याचे गटविकास अधिकारी जे.डी गोरे,व जि.प.पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता भोजराज यांनी वाचन केले.परंतू प्रत्यक्ष सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवकांना या प्रस्तावित आराखड्याविषयी बैठकीच्या अध्यक्षा आ.अमिता चव्हाण आणि खा.अशोक चव्हाण यांनी विचारणा केली असता फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा असलेल्या महागावच्या सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवकांनी पाठविलेला प्रस्ताव चुकीचा असल्याचे आणि पाण्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या लगळूद गावास आवश्यकता नाही म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांनी हे गाव ” निरंक “च्या यादीत नोंद केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. बैठकीच्या समारोपात हाच मुद्दा गृीत धरुन हा आराखडा बनावट असल्याची पुष्टी देत खा.अशोक चव्हाण यांनी तहसिलदार व्यंकटेश मुंडे व गटविकास अधिकारी जे.डी गोरे यांना धारेवर धरत कागदाला कागद जोडून वेळकाढूपणा करु नका.निवारणातील पहिल्या टप्प्याचे कामे अद्यापही अपुर्ण आहेत व दुस-या टप्प्यातील कामे कमी वेळेत होण्याची शक्यता नाही.कारण जुने बोअर दुरुस्ती यंत्रणा नाही,नूतन बोअरवेलसाठी खोदकाम मशिनचे टेंडर काढले नाहीत.भूजल सर्वेक्षण करण्यात आले नाही व या विभागात अधिकारी कमतरता आहे.त्यामुळे प्रमाणपत्रे लवकर मिळणे शक्य नाही.अशा अनेक त्रुट्या त्यांनी निदर्शनास आणल्या व अधिका-यांनी कागदोपत्री बनवाबनवी केल्याचे उघड झाल्याने सदोष आराखडा त्वरीत तयार करुन जनतेच्या पाणी समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात म्हणून झाप झाप झापले. माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण हे अशा बैठकित पहिल्यांदाच बरसल्याचा प्रत्यय आल्याने उपस्थितांमध्ये कुतूहलाचा विषय होता परंतू त्यांच्या या राैद्रावताराने हे अधिकारी घाबरतील का व ही कामे लवकर लवकर करतील का ? याकडे पाणी टंचाईग्रस्त ताहणलेल्या ग्रामस्थांसह अनेकांचे लक्य लागले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो;सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो – अजित पवार

News Desk

काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा हरपला!

News Desk

“जिथे पूर परिस्थिती होती तिथे अजूनही कोरोनाचं संकट घोंगावतये” – उद्धव ठाकरे

News Desk