HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याण डम्पिंग ग्राऊंडवरील कच-याच्या आगीतून संशयाचा ‘धूर’

 

कल्याण : कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला वारंवार लागणा-या आगीमुळे आता संशय निर्माण होतो आहे.

आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास खाडीकिनाऱ्या दिशेकडील कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. सुरुवातीला कमी वाटत जाणारी ही आग जोरदार वाऱ्यामुळे काही वेळातच पसरली. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाला माहिती कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. महापालिकेच्या 3 गाड्या आणि 2 टँकरनी ही आग आटोक्यात आणली. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक आणि भाजप गटनेते वरूण पाटील यांनी 15 दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. वाढलेले तापमान पाहता डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग लागण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे वरूण पाटील यांनी सांगितले.

एकंदरीत यंदाच्या उन्हाळ्याबाबत हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता डम्पिंग ग्राऊंडवरील आगीच्या घटनांबाबत पालिका काय उपाययोजना करते, ते येत्या दिवसांत स्पष्ट होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे, कृष्णकुंज !

Gauri Tilekar

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात झाली कागदपत्रांची फेकाफेकी…!

News Desk

कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

News Desk