HW News Marathi
महाराष्ट्र

गृहनिर्माणाची कामे त्वरीत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, गृहनिर्माण विभागांतर्गत असलेल्या विविध कार्यालयांची सुरु असलेली कामे त्वरीत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज मंत्रालयात आयोजित गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर उपस्थित होते.

फडणवीस यांनी बी.डी.डी.चाळीचे पुनर्वसन, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची कामे, संरक्षण दल आणि रेल्वेच्या रिकाम्या जागेचा वापर, गृहनिर्माण धोरण, माहिम नेचर पार्क, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या कायद्यात दुरुस्ती करणे, विविध कार्यालयांच्या कार्यपद्धतीचे सुलभीकरण, ‘महारेरा’ची अंमलबजावणी आदी विषयांचा आढावा घेतले.

प्रारंभी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कार्य अधिकारी श्रीनिवासन यांनी गृहनिर्माण विभागाचे सादरीकरण केले. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव नितीन करीर, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, आर्यन खान प्रकरणी नवाब मलिक याचं मोठं विधान!

News Desk

संजय राऊत यांची आज पत्रकार परिषदेत काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

अनेक आले आणि गेले, मात्र शिवसेना ५५ वर्षे कायम राहिली आणि राहणार !

News Desk