HW Marathi
Uncategorized देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स भाजप नेते चालवतात- जयंत पाटलांचं टीकास्त्र

सांगली | अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकल्या. अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी या धाडी टाकल्या जात आहेत. भाजपचे नेते ज्याचं नाव घेतात त्याच्यावर धाड सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स कारवाई करत आहे. त्यामुळे सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे अधिकारी चालवत नाहीत तर भाजपचे नेते चालवतात, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

शेतकऱ्याला चिरडून मारले तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत

ते सांगलीच्या कुंडल येथे बोलत होते. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथे विधानपरिषदेचे पुणे पदवीधरचे आमदार आमदार अरुण अण्णा लाड यांचा भव्य नागरी सत्कार घेण्यात आला होता. या कार्यक्रमास मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी भाजप वर टीकास्त्र केले. या देशात शेतकऱ्याच्या हातात काही जाऊ लागले तर भाजपला ते सहन होत नाही. भाजपचा हा चेहरा वारंवार दिसून येत आहे. या देशात शेतकऱ्याला चिरडून मारले तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. शेतकऱ्याचा गळा कापण्याच्या प्रयत्न करत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.

आपल्या देशात दोन माणसं सगळे खाजगीकरण करण्यात व्यस्त आहेत. पण याचा फरक तुम्हाला पडणार आहे, कारण याचा फटका सर्वच क्षेत्रात महागाई वाढणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले. सोयाबीनचा दर11 हजार झाला असता शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले तर भाजपवाल्यांना ते सहन झालं नाही. त्यामुळे दर पाडला गेल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Related posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे धरणे आंदोलन

News Desk

आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेना युतीला पाठिंबा

News Desk

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

News Desk