HW News Marathi
महाराष्ट्र

जीएसटीच्या धसक्याने मुंबईत व्यापाऱ्याची आत्महत्या

मुंबई : देशाच्या करप्रणालीत आमूलाग्र बदल करण्यासाठी ‘एक देश, एक कर’चा उद्घोष करीत केंद्र शासनाने या महिन्याच्या सुरुवातीपासूनच वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी देशभर लागू केला. या नव्या करप्रणालीमुळे व्यावसायिक आणि उद्योजक धास्तावले आहेत. त्यातूनच जीएसटीमुळे धंदा बसण्याच्या चिंतेने मुंबईतील मनीष खुबचंद मेहता या व्यापाऱ्याने गुरुवारी सकाळी टोलेजंग इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

मेहता पश्चिम उपनगरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ऑक्टा क्रेस्ट सोसायटीत राहात होते. त्यांच्या पत्नीनं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेले होते. परत येताना त्यांनी दूध आणले होते. त्यानंतर ते बाल्कनीमध्ये गेले आणि कोणाला काही कळण्याच्या आत त्यांनी स्वत:ला खाली झोकून दिले.

मेहता यांचा कपड्याचा व्यवसाय होता. धंद्यासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज काढले होते. पावसाळ्यामुळे व्यवसायातील मंदी आणि त्यातच जीएसटी लागू झाल्यामुळे ते अस्वस्थ होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चूक नसलेल्यांना शिक्षा केली, तर काय करायचं?”, शेलारांचा शरद पवारांना सवाल

News Desk

“…आणि भाई जगताप पोलिसांवर भडकले”, म्हणाले…

News Desk

मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

News Desk