HW News Marathi
महाराष्ट्र

देशाच्या विकासासाठी जीएसटी आवश्यक – कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर

उत्तम बाबळे

नांदेड :- एक राष्ट्र एक कर या ब्रीद वाक्यातून वस्तू व सेवा करांची निर्मिती झाली. एकाच वास्तूसाठी केंद्राचा वेगळा कर, राज्याचा वेगळा कर आणि स्थानिक संस्थेचा वेगळा कर आजपर्यंत असे होत होते. यामध्ये पुरेशी समन्वयता नसल्यामुळे बऱ्याच प्रमाणात कर चोरीचे प्रमाण होत असे. त्यामुळे देशाचे नुकसान होत होते. वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या माध्यमातून एकाचवेळी कर आकारण्यात येणार आहे. ज्यामुळे देशाच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) आवश्यक आहे असे मत कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुल, परभणी येथील कमलाताई जामकर महाविद्यालय आणि नांदेड येथील आयसीए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) या एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले, ज्ञान स्रोत केंद्राचे प्र-संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, कार्यशाळेच्या मुख्य समन्वयीका डॉ. वाणी लातूरकर, सीए अंकित संघवी आणि पंकज संघवी यांची उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, समाजामध्ये आज जीएसटी बद्दल बरेच गैरसमज आहेत. एक जुलै पासून लागू झालेल्या या कराबद्दल उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात पुरेशी जागृता नाही. त्यामुळे विद्यापीठाने अशा कार्यशाळेद्वारे उपस्थित प्राध्यापकांना तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. वस्तू व सेवा कराबद्दल पूर्णपणे जाणून घेऊन समाज व विद्यार्थ्यांना त्याबद्दल पूर्ण जाणीव करून द्यावी हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.

प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले, कार्यशाळेच्या मुख्य समन्वयीका डॉ. वाणी लातूरकर यांचेही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन लाभले. वस्तू व सेवा कर विषयी विशेष मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील सीए अंकित संघवी आणि पंकज संघवी यांनी दिवसभर याकार्यशाळेत जीएसटी बद्दलची इत्यंभूत माहिती दिली. याकार्यशाळेस विद्यापीठ परिक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमरप्रीतकौर रंधावा यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला फॉलो करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://plus.google.com/u/0/

https://twitter.com/Mahabatmi1

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्टेअरींग अजित पवारांकडे असलं तरी गाड्या आम्ही पुरवतो-संजय राऊत

News Desk

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अमित ठाकरेंनी दिली भेट

News Desk

‘मुका’ घेण्याचं वक्तव्य महागात, रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसात तक्रार!

News Desk